रत्नागिरी बसस्थानक आणि शहरातील रस्ते सुधारण्याप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी समविचारी मंचाचे आज घंटानाद आंदोलन
रत्नागिरी बसस्थानकाचे रखडलेले बांधकाम आणि गणेशोत्सवाच्या पूर्वी शहरातील रस्ते सुधारणा करण्याप्रश्नी महाराष्ट्र समविचारी मंचच्यावतीने आज थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे.
रत्नागिरी येथील मध्यवर्ती बस स्थानकाचे बांधकाम गेली अनेक वर्षे रखडलेले आहे त्याशिवाय गणेशोत्सव तोंडावर आलेला असतानांही शहरातील रस्ते पूर्णत्वास जात नाहीत. याविषयी संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने रत्नागिरी येथील बस स्थानकासमोर सकाळी ११ ते १ या वेळात थाळीनाथ आंदोलन करण्यात येणार आहे.
तरी समविचारीने आयोजिलेल्या या आंदोलनात तमाम रत्नागिरीकर, समाजसेवक, विविध सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र समविचारी मंच च्या वतीने करण्यात आले आहे.
www.konkantoday.com