कोकणासह राज्याच्या विविध भागांत अतिवृष्टी व महापुराने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पाच हजार कोटी वा त्यापेक्षाही अधिक रकमेचे पॅकेज

0
86

कोकणासह राज्याच्या विविध भागांत अतिवृष्टी व महापुराने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मदतीचे पॅकेज राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत मंजूर करण्यात येणार आहे. या पॅकेजचे स्वरूप निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी बैठक झाली. पाच हजार कोटी वा त्यापेक्षाही अधिक रकमेचे पॅकेज बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
आजच्या बैठकीला विविध विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. झालेले नुकसान प्रचंड असून निकषांपलीकडे जाऊन मदत देण्याची आवश्यकता आहे, याबाबत बैठकीत एकमत झाले.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here