सात राज्यांत बर्ड फ्लू, आढळला इन्फ्लुएन्झामुळे विविध राज्यांतील अनेक पक्ष्यांचा झपाटय़ाने मृत्यू

कोरोनाचे संकट कायम असताना देशात आता बर्ड फ्लूने थैमान घालायला सुरुवात केली आहे. सात राज्यांत बर्ड फ्लू आढळला असून इन्फ्लुएन्झामुळे विविध राज्यांतील अनेक पक्ष्यांचा झपाटय़ाने मृत्यू होत आहे. त्यातच महाराष्ट्रातही काही मृत पक्षी आढळल्यामुळे राज्यात बर्ड फ्लूचा धोका तर नाही ना हे पाहण्यासाठी मुंबई, ठाणे, दापोली, परभणी आणि बीड जिह्यांतील मृत कावळय़ांचे नमुने भोपाळच्या आयसीएआर-नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हायसेक्युरिटी ऍनिमल डिजीस या संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत.
देशातील उत्तर प्रदेश, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरयाणा या राज्यात बर्ड फ्लूची साथ वेगाने पसरत आहे. तशी माहीती केंद्राच्या पशुसंवर्धन विभागाने दिली असून साथ रोखण्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button