परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी शाळांमध्ये बोगस प्रवेश देणार्या जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिला आहे. तालुक्यातील पडवे येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरून वादंग निर्माण झालेले असताना जाधव यांनी दिलेल्या या इशार्यामुळे बोगस प्रवेश देणार्या शैक्षणिक संस्थांचे धाबे दणाणले आहेत. www.konkantoday.com