रत्नागिरी जिल्ह्यातील शिंदे अंबेरी ता. संगमेश्वर येथे सहा कोटीच्या व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीबाबत चार जण ताब्यात

पोलिस व विना वनविभाग यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिंदे अंबेरी ता. संगमेश्वर येथे व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीबाबत अज्ञात व्यक्तीनी दिलेल्या माहितीनुसार सापळा रचून वनविभाग रत्नागिरी व स्थानिक पोलीस विभाग यांनी संयुक्तरित्या कारवाई करून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे .त्यांच्याकडून सुमारे ६ कोटींची व्हेल माशाची उलटी व एक कार जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी वन व पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रसाद प्रविण मयेकर , वय ३२ , रा . ता . रत्नागिरी जि . रत्नागिरी , नरेंद्र वसंत खाडे , वय ५४ , रा . काखरतळे ता . महाड जि . रायगड , सत्यभामा राजू पवार , वय ४५ , रा . दत्तनगर , माणगाव ता . महाड जि . रायगड ,अजय राजेंद्र काणेकर , वय -३६ , रा . असगोली ता . गुहागर यांना अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून व्हेल मासा उल्टी ( Ambergris ) ६.२ किलो व कार वाहन क्र . MHOBAN4033 जप्त करून घेतली आहे. वरील सर्व आरोपींच्या विरुध्द वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम , १ ९ ७२ अन्वये परिक्षेत्र वन अधिकारी , चिपळूण यांचेकडील प्र.गु.रि. ०२/२०२१ दि . २१/१०/२०२१ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
व्हेल माशाची उलटी म्हणजे एक दगडासारखा पदार्थ असतो . त्याला अॅम्बरग्रीस असे म्हणतात . व्हेल माशाने तो तोंडातून बाहेर फेकला की तो वाहत किनाऱ्यावर येतो . या उल्टीतुन सुगंधी द्रव्ये ( सुगंधी अत्तर , बॉडी स्प्रे इ. ) करता मोठया प्रमाणात मागणी असलेने जागतिक बाजारपेठेमध्ये त्याला मोठी किंमत मिळते.त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button