संगमेश्वर तालुक्यातील डावखोल कठेवठार येथे घरफोडी प्रकरणी पाेलिसानी आरोपीच्या मुसक्या आवळल्या
संगमेश्वर तालुक्यातील डावखोल कठेवठार येथे घरफोडी प्रकरणी पाेलिसानी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेतही घरफोडी स्थानिक तरूणाने केल्याचे निष्पन्न झाले आहे संशयित रूपेश अरविंद शिंदे या आरोपीला अटक करून शुक्रवारी देवरूख न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायाधीशांनी १९ जुलै पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.फिर्यादी जयेश पालांडे व त्यांची आई अनिता पालांडे या रात्री ८ ते १०.३० या वेळेत कारकर यांच्या घरी गेल्या होत्या. पालांडे यांच्या घरीच कोणीच नसल्याचे संधी चोरट्यांनी साधली. घराच्या पुढील दरवाजे कुलुप हत्याराने उचकटून चोरट्यांनी गोदरेज कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले ६० हजार रूपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती. जयेश पालांडे रात्री पुन्हा घरी आले असता, चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला चोरीचा पर्दाफाश करण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ञ यांना शुक्रवारी पाचारण करण्यात आले होते. चोरट्याचा माग काढण्यात संगमेश्वर पोलीसांना यश आले आहे. रूपेश अरविंद शिंदे असे आरोपीचे नाव आहे. जेवण्याच्या कार्यक्रमावेळी रूपेश शिंदे हा उशीरा दाखल झाला होता. यामुळे पोलीसांंचा संशय त्याच्यावर बळावला होता. तपास मोहिम सुरू असताना गुरूवारी रूपेश याने चोरीची कबुली दिली.
www.konkantoday.com