
रत्नागिरीत आज ८०० मेट्रीक टन खत घेवून रेल्वे वॅगन घेवून दाखल होणार
रत्नागिरी रेल्वेस्थानकात आज सुमारे ८०० मेट्रिक टन खत मालगडीतून दाखल होणार आहे. त्यामुळे ऐन भातशेतीच्या हंगामात निर्माण झालेली खताची टंचाई कमी होणार आहे. कृषी विभागाकडून शेतकर्यांच्या मागण्या घेण्यात आल्या असून खत प्राप्त होताच त्यांना बांधावर उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे.
मजूर नसल्यामुळे रत्नागिरी रेल्वेस्थानकात दाखल झालेले खत उतरवण्यात अडचणी निर्माण झालेल्या होत्या. त्यामुळे पहिल्या तीन गाड्या पाठविण्यात आलेल्या नव्हत्या. पहिल्या तीन गाड्या सोडल्यानंतर आरसीएफकडून खताची गाडीच पाठविण्यात आलेली नव्हती. परिणामी जिल्ह्यात शेतकर्यांना खतच मिळत नव्हते. कोकणात सर्वाधिक भातशेतीला युरिया खत वापरले जाते. पेरण्यांची सुमारे साठ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता खताची मात्रा देणे आवश्यक आहे. खत मिळाले नाही तर रोपांची व्यवस्थित वाढ होणे अशक्य आहे. त्यामुळे शेतकर्यांची तगमग सुरू झाली आहे.
www.konkantoday.com