रत्नागिरी जिह्यातील कोरोना मुक्त गावांची संख्या घटली
रत्नागिरीजिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात एक हजाराहून अधिक गावे कोरोनामुक्त होती. मात्र पंधरा दिवसात त्यात घट झाली असून सध्या ८४९ गावे कोरोनामुक्त आहेत.
माझे गाव माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात गावोगावी कोरोना चाचण्यांची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामुळे गेल्या महिनाभरात चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली. दुसर्या लाटेमध्ये बाधित मोठ्या प्रमाणात वाढले. जिल्ह्यातील पॉझिटीव्हीटी रेटही कमी झालेला नाही. गावपातळीवरील बाधितांना शोधून काढून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक कार्यवाही सुरू झाली. दिवसाला पाच ते सात हजाराच्या दरम्यान चाचण्या होवू लागल्या. याही परिस्थितीत जिल्ह्यातील अनेक गावे कोरोनामुक्त राहिली आहेत. हा आकडा कमी अधिक होत आहे. जुलैच्या सुरूवातीला एकही बाधित नसलेल्या गावांची संख्या हजाराच्यावर होती. मात्र त्यात मोठी घट झाली आहे.
www.konkantoday.com