भरलेला समजून रिकामाऑक्सिजन ड्युरा सिलेंडर लावला,चिपळूण कामथे रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे रुग्णांचे प्राण आले होते धोक्यात

चिपळूण येथील कामथे रुग्णालयात प्राणवायू देणारा रिकामा सिलेंडर लावला गेल्याने जवळजवळ पस्तीस रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता मात्र प्रसंगावधान राखल्याने पर्यायी व्यवस्था केल्याने हा धोका टळला चिपळूणच्या कामथे उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ४ड्युरा सिलेंडर देणगी स्वरूपात मिळाली आहेत, एक ड्युरा सिलेंडर सहा तास प्राणवायू पुरवतो, आळीपाळीने १सिलेंडर भरून आणला जातो,
रुग्णांना प्राणवायू देण्यासाठी काल असाच एक सिलेंडर लावण्यात आला, मात्र काही वेळाने रुग्ण अस्वस्थ झाल्याने हॉस्पिटलमध्ये पळापळ झाली आणि मग लावलेला सिलेंडर हा रिकामा असल्याचं समजलं,अस्वस्थ रुग्णांना ऑक्सीजन सिलेंडर लावला जातो मात्र अशा गलथान कारभारामुळे कोविड रुग्णांचे प्राण धोक्यात आले होते
विशेष म्हणजे हा गंभीर प्रकार घडला तेव्हा हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर हजरच नव्हते.
सुदैवाने हॉस्पिटलमध्ये दहा जम्बो सिलेंडरचा स्टॉक मध्ये असल्यामुळे मोठा अनर्थ टाळला अन्यथा वितरकाने पाठवलेले या रिकाम्या सिलेंडर मुळे अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आला असता.
या गंभीर प्रकाराबाबत माहिती घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक रामशेठ रेडीज, शहनवाज शाह, सिद्धेश लाड आणि संदेश मोहिते हॉस्पिटल मध्ये दाखल झाले त्याने या प्रकाराची गंभीर दखल घेतली सदरचा सिलिंडर लोटे midc मधील क्रायो गॅस एजन्सीने हा सिलेंडर पाठविण्यात आला असल्याचे कळते
रुग्णालयाचे डॉक्टर सानप यांनी सदर एजन्सीला नोटीस दिल्याचे समजते मात्र असे असले तरी रुग्णालयाचा बेफिकीरपणा यानिमित्ताने उघड झाला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेेबाबतच्या तक्रारी वाढत आहेत
लोटे ते कामथे अशी सिलेंडर वाहतूक करताना दरड व पुराच्या पाण्याचा धोका उद्भवून हा पुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्याने त्याला पर्याय म्हणून अत्यावश्यक म्हणून खडपोली येथील रायगड गॅस एजन्सी मधून सिलेंडर पर्यायी व्यवस्था करण्यात यावी दोषी या प्रकाराला जबाबदार असणार्या संबंधितांवर कडक व्हावी अशी मागणी होते आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button