
रत्नागिरी शहरातील संपर्कसेवा पूर्ववत
रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात बीएसएनएल आणि भारती एअरटेलचे नेटवर्क रविवारपासूनच ठप्प झाले होते. मात्र ही सेवा सोमवारी पूर्ववत झाली आहे. रत्नागिरीतील बीएसएनएलसह कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार नेटवर्कची सुविधा साखरपा कोल्हापूर आणि गोवा या दिशांनी जिल्ह्याला प्राप्त होते. यातील साखरपा मलकापूर आणि मालवण येथे बीएसएनएलच्या ऑप्टिकल फायबरमध्ये बिघाड झाला होता. प्राथमिक माहितीनुसार हा बिघाड रस्त्याच्या कामामुळे झाला होता. तर एअरटेल संदर्भात देखील अशाच स्वरूपाचा बिघाड झाला होता. मात्र सोमवारी दोघांचे देखील नेटवर्क पूर्ववत झाल्याने जिल्ह्यातील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. www.konkantoday.com