तवसाळ येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान

गुहागर : तवसाळ बाबरवाडी येथील सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वन विभागाने जीवदान दिले. ग्रामस्थांच्या साह्याने पिंजर्‍याद्वारे दीड वर्षाच्या बछड्याची सुटका केली. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडून तपासणी करून या बछड्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. दि. 1 जूनला रात्री  बछडा विहिरीत पडला होता. गुरुवारी सकाळी विहिरीच्या ढासळलेल्या भागात बछडा बसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर गुहागरचे वनपाल संतोष परशेट्ये, खेडचे वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक अरविंद मांडवकर, संजय दुंडगे, दत्ताराम सुर्वे पिंजरा घेऊन घटनास्थळी पोहोचले. तेथील ग्रामस्थांच्या मदतीने या बछड्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले.  या बछड्याला वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button