![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2020/11/images.jpeg-498.jpg)
देवेंद्रजी तुम्ही आता खरच राजकीय संन्यास घ्या, तुमच्या जाचातून मराठी माणूस तरी मोकळा होईल -भास्करशेठ जाधव यांची टीका
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खरोखरच राजकीय संन्यास घ्यावा, असा मित्रत्वाचा सल्ला शिवसेना प्रवक्ते आ. भास्करशेठ जाधव यांनी दिला आहे.
कोरोना महामारीत हुकलेली सत्ता स्थापन करण्याची संधी आहे, अशा पद्धतीने खोटेनाटे आरोप देवेंद्र फडणवीस करीत आहेत. यांची वक्तव्य ऐकून जनतेला किळस आला आहे. कधी संन्यास घेईन तर कधी अमुक करीन हेच यांचे सुरू असते. देवेंद्रजी तुम्ही आता खरच राजकीय संन्यास घ्या, तुमच्या जाचातून मराठी माणूस तरी मोकळा होईल, असे थेट आव्हान आणि बोचरी टीकाही शिवसेना प्रवक्ते आ. जाधव यांनी केली.
www.konkantoday.com