रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा दोन जिल्ह्यांसाठी असलेले राजापुरातील पासपोर्ट सेवा केंद्र पुन्हा सुरू

कोरोनाच्या संसर्गामुळे यापूर्वी प्रदीर्घकाळ बंद असलेले राजापुरातील पासपोर्ट कार्यालय सुरू झाले आहे
रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा दोन जिल्ह्यांसाठी असलेले राजापुरातील पासपोर्ट सेवा केंद्र पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या पाच दिवसांत सुमारे ५१ नागरिकांनी पासपोर्ट कार्यालयात येऊन पासपोर्टची नोंद केली आहे.
सुमारे तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून व रत्नागिरी, सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने तळकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना सोयीस्कर ठरेल असे पासपोर्ट सेवा केंद्र राजापूर पोस्ट कार्यालयात सुरू केले होते. मागील कालावधीत दोन जिल्ह्यांतील नागरिकांनी या सेवा केंद्राच्या माध्यमातून पासपोर्ट काढले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button