
रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांकडून विजय जल्लोषाची जोरदार तयारी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवर नारायण राणे यांचा विजय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एक्झिट पोलच्या या अंदाजानंतर आता राणे यांचे समर्थक कामाला लागले आहेत. नारायण राणे यांचे मुंबई, सिंधुदुर्गातील कार्यकर्ते रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होणार आहेत. रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांकडून विजय जल्लोषाची जोरदार तयारी केली जात आहे. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांना राहण्यासाठी रत्नागिरीतील हॉटेल्स बुक करण्यात येत आहेत. तशा हालचाली चालू झाले आहेतरत्नागिरी-सिंधुदर्ग या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विनायक राऊत यांच्यात लढत झाली. राणे यांच्या विजयासाठी भाजपने संपूर्ण ताकद लावली होती. येथे सामान्य कार्यकर्त्यापासून नरेंद्र मोदी यांच्यासारख्या सर्वोच्च नेत्यानेही राणे यांच्यासाठी प्रचार केला. दुसरीकडे राऊत यांच्या विजयासाठीदेखील ठाकरे यांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. राऊत यांच्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. म्हणजेच काहीही झालं तरी या जागेवर आमचाच विजय व्हावा, यासाठी दोन्ही बाजूने पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे या जागेवरून कोण जिंकणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.www.konkantoday.com