रत्नागिरीत भरारी पथकाची मद्यसाठ्यावर धाड , २ लाख ८८ हजाराचा मुद्देमाल जप्त

0
54

रत्नागिरी रेल्वे स्टेशन जवळ रत्नप्रभा होसींग सोसायटी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून ३८ हजार ९६० रुपयांच्या दारुसह २ लाख ८८ हजार ९६० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
रत्नप्रभा होसींग सोसायटी येथे देशी विदेशी मदयाचा साठा केला असल्याची माहीती भरारी पथकाला खब-यामार्फत मिळाली होती. या नुसार विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार, प्र. अधिक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी ओमगौरी चायनीज सेंटर येथून देशी विदेशी मदयाचा साठा जप्त केला. तसेच आरोपी लॉकडाउनचा फायदा घेवून त्याचे स्वताचे वाहनातून विक्री करीत होता अशी खबर मिळाली होती. त्यानुसार त्याच्या हुंदाई आय 10 वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये देशी विदेशी मदयाचा साठा मिळून असा एकूण २ लाख ८८ हजार ९६०रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास करण्यात आली. ही कारवाई भरारीपथकाचे निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक सुनील सावंत, किरण पाटील, जवान विशाल विचारे, अनिता नागरगोजे यांनी केली. याप्रकरणी अविनाश सीताराम दळवी रा रत्नागिरी जि. रत्नागिरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जिल्हयात लॉकडाउन कालावधीत अवैध गावठी दारूची व गोवा बनावटीच्या मदयाची विक्री होवू नये म्हणून करडी नजर ठेवणार असल्याचे प्र. अधिक्षक व्ही. व्ही. वैदय यांनी सांगितले.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here