डॉ. जयंत नारळीकर लिखित ‘साहित्य अकादमी पुरस्कारविजेती ‘व्हायरस’ ‘स्टोरीटेल मराठी’च्या ‘ऑडिओबुक’मध्ये!
प्रतिभावंत साहित्यिक, प्रज्ञावंत शास्त्रज्ञ, तळमळीचे विज्ञानप्रसारक आणि समतोल समाजचिंतक पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांनी मराठी विज्ञान कादंबरीला समृध्द केले आहे. २०१५ सालच्या ‘साहित्य अकादमी पुरस्काराने’ सन्मानित ‘व्हायरस’ हि सायन्स फिक्शन कादंबरी आता ‘स्टोरीटेल मराठीच्या’ लोकप्रिय ‘ऑडिओबुक’ मध्ये उपलब्ध झाली आहे. आवाजाच्या दुनियेतील जादूगार व्हॉइसिंग आर्टिस्ट अनिरुद्ध दडके यांच्या खणखणीत आवाजात साहित्यप्रेमी आणि विज्ञानप्रेमी श्रोत्यांचं कुतूहल चाळवणारी हि कादंबरी ‘स्टोरीटेल मराठीच्या’ ‘ऑडिओबुक’ मध्ये ऐकणं आता पर्वणी ठरणार आहे.
‘व्हायरस’ ‘स्टोरीटेल मराठी’च्या ‘ऑडिओबुक’ मध्ये ऐकत असताना अप्रत्यक्ष रित्या डोळ्यांसमोर एक परकीय जीवसृष्टी उभी राहते. या पुस्तकात समाविष्ट असलेल्या कथेत मानवी जीवनासमोर अस्तित्त्वात आलेले संकट उद्भवणार्या प्राणघातक विषाणूचा धोका दर्शविला गेला आहे. आलेल्या संकटावर वैज्ञानिक मिळून कशी मात करतात? हे जाणून घ्यायचं असेल तर , नक्की ऐका प्रसिद्ध व्हॉईसओव्हर आर्टिस्ट अनिरुद्ध दडके यांच्या आवाजात ,”व्हायरस”
‘व्हायरस’ (इ.स. 1996) ही नारळीकरांची चौथी कादंबरी. वसाहतवादी प्रेरणांनी संगणकप्रणालीत विषाणू सोडून परग्रहावरील सजीवांनी केलेले छुपे आक्रमण, पृथ्वीवासियांनी त्याचा लावलेला छडा आणि केलेला प्रतिबंध हे ‘व्हायरस’चे मुख्य आशयसुत्र आहे. निरनिराळया राष्ट्रांतील जीवन विस्कळीत होऊ लागते, यामागे राष्ट्रीय कारवाया आहेत, याचा छडा लावण्याचा प्रयत्न निनिराळया राष्ट्रांतील शास्त्रज्ञ, लष्करी तज्ज्ञ आणि प्रशासकीय यंत्रणा घेत असतात, हे ‘व्हायरस’चे उपसूत्र आहे. पृथ्वीपासून सहा प्रकाशवर्षे दूर अंतरावर असलेल्या ताऱ्यापर्यंतच्या असीम स्थलावकाशात साडेसहा वर्षांच्या काळात घडलेल्या घटनांची कथा म्हणजे ही कादंबरी होय. बुध्दिमान वैज्ञानिकांचे अंतर्गत व्यवहारविश्व आणि त्यांच्याभोवतीची प्रशासनयंत्रणा यांचे चित्रण हे ‘व्हायरस’चे दुसरे उपसूत्र आहे. अशा प्रकारे मध्यवर्ती आशयसूत्राला परिपुष्ट करणाऱ्या पूरक आणि पोषक उपसूत्रांनी ‘व्हायरस’ भरीव होते. ‘व्हायरस’ कादंबरी ‘स्टोरीटेल मराठीच्या’ लोकप्रिय ‘ऑडिओबुक’ मध्ये ऐकताना श्रोत्यांना हॉलिवूडच्या ‘इंडिपेन्डन्स डे’ चित्रपटाची आठवण करून देणारे गोष्ट आपण ऐकत असल्याचा भास होत राहतो.
‘व्हायरस’मधील थरार आणि रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला ‘स्टोरीटेल’ डाउनलोड करावे लागेल. ‘स्टोरीटेल’द्वारे सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जात आहे आणि त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्या रसिकांचा अमाप प्रतिसाद मिळू लागला आहे. दरमहा फक्त रू. २९९/- मध्ये मराठी, इंग्रजीसह सर्व भारतीय भाषांतील ऑडिओबुक्स किंवा दरमहा फक्त रू.१४९/- मध्ये, मराठी पुस्तके ‘सिलेक्ट मराठी’ योजनेत मिळतात. ऑडिओबुक्स कुठेही, कितीही व कधीही ऐकता येतात.