
रत्नागिरी जिल्हा खुली निवड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद चिपळूण येथील विवेक जोशी याने प्राप्त केले.
*(कै.) अनिल कानविंदे स्मृती रत्नागिरी जिल्हा खुली निवड बुद्धिबळ स्पर्धा मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीत झाली. या स्पर्धेचे विजेतेपद चिपळूण येथील विवेक जोशी याने प्राप्त केले. ओंकार सावर्डेकर उपविजेता ठरला. या स्पर्धेतून चार बुद्धिबळपटूंची निवड जळगाव येथे असलेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरिता करण्यात आली.जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने रत्नागिरी चेस अॅकॅडमीतर्फे आयोजित स्पर्धेत विवेक व ओंकार दोघांनीही सात फेऱ्यांमध्ये सहा गुण प्राप्त केले; परंतु सरस टायब्रेकवर विवेकने बाजी मारली. रत्नागिरीच्या यश गोगटे व सौरिश कशेळकर यांनी प्रत्येकी साडेपाच गुणांसह अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकावला. स्पर्धेस खेड, राजापूर, चिपळूणव रत्नागिरी येथील एकूण ५० स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विवेक सोहनी, सुभाष शिरधनकर, मंगेश मोडक, चैतन्य भिडे यांनी परिश्रम घेतले.विविध गटांमधील उत्तेजनार्थ पारितोषिके अशी ः पंधरा वर्षांखालील प्रथम व द्वितीय : हृषिकेश कुंभारे, शुभम बावधनकर. १३ वर्षाखालील प्रथम व द्वितीय : नंदन दामले, रूमीन वास्ता. ११ वर्षांखालील- प्रथम व द्वितीय : आयुष रायकर, आराध्य गर्दे. ९ वर्षाखालील प्रथम व द्वितीय : शर्विल शहाणे, विहंग सावंत. महिलांमध्ये प्रथम व द्वितीय : सई प्रभुदेसाई, मृणाल कुंभार.