अशा महाविद्यालयांवर कारवाई करावी -युवक क्रांती दल (युक्रांद) संघटनेनेची मागणी
एकीकडे कोरोनाचं संकट दुसरीकडे पालकांचं उत्पन्न ठप्प झालेलं असताना अनेक महाविद्यालयं विद्यार्थ्यांकडून फीची मागणी करत आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे अर्ज देखील नाकारले जात आहेत. याच मुद्द्यावर युवक क्रांती दल (युक्रांद) संघटनेने उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांची भेट घेत महाविद्यालयीन फी कमी करण्याची मागणी केलीय. “सरकारने विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्याचे परिपत्रक काढूनही महाविद्यालयं विद्यार्थ्यांना नाहक त्रास देत आहेत. याबाबत तातडीने लक्ष घालून अशा महाविद्यालयांवर कारवाई करावी. तसेच विद्यार्थ्यांची चालू शैक्षणिक वर्षातली फी कमी करावी,” अशी मागणी युक्रांदने केली आहे
www.konkantoday.com