
हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार -माजी खासदार किरीट सोमय्या
अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय. साताऱ्यातील कराडमध्ये सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधला.किरीट सोमय्या म्हणाले, “हसन मुश्रीफ यांनी अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केलाय. या साखर कारखान्याचे कागदपत्र उद्या (21 सप्टेंबर) ईडी आणि इन्कम टॅक्सकडे देणार आहे.”
“2020 मध्ये कोणतंही पारदर्शक लिलाव न होता, ब्रिक्स इंडिया या खासगी कंपनीला देण्यात आला. या कंपनीला कुठलाही अनुभव नाही. त्यांना का देण्यात आला, शरद पवारांना चांगलं माहित आहे. कारण हसन मुश्रीफ यांचे जावई या कंपनीचे बेनामी मालक आहेत,” असंही किरीट सोमय्या म्हणाले.
हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार आहे, असंही किरीट सोमय्या म्हणाले.
www.konkantoday.com