
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्योगांची वीज महाग असल्याचीऊर्जा मंत्र्यांची कबुली
कृषीपंपासह इतर वीजग्राहकांना स्वस्त वीज मिळावी यासाठी सुमारे ७५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार औद्योगिक-व्यावसायिक वीज ग्राहकांवर पडतो. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्योगांची वीज महाग असल्याची कबुली देत राज्य सरकारकडून भरीव आर्थिक सहाय्य मिळाल्यास हे दर कमी होणे शक्य आहे. त्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाईंसह राज्य मंत्रिमंडळाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले.
www.konkantoday.com