दापोली तालुक्यातील मुरुड येथील समुद्र किनाऱ्यावर ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य व ग्रामस्थांनी जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाला दिले जिवदान

दापोली तालुक्यातील मुरुड येथील समुद्र किनाऱ्यावर ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य व ग्रामस्थांनी जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाची सुटका करून जीवदान दिले.
या किनाऱ्यावर दरवर्षी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या अनेक माद्या अंडी घालण्यासाठी येतात. त्यांचे संरक्षण करून येथील ग्रामस्थ व त्या अंड्यामधून बाहेर येणाऱ्या पिल्लांना सुरक्षित पुन्हा पाण्यात सोडण्याचं काम करतात. याच जातीचे कासव शनिवारी सकाळी मुरुड समुद्र किनारी पूर्णपणे जाळ्यात फसले हाेते. याचठिकाणी राज साळवी, रोशन जाधव, ओंकार जाधव, किशोर कापडी आणि ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य राजेश शिगवण हे नेहमीप्रमाणे किनारपट्टीवर फेरफटका मारत होते.त्यावेळी हे कासव जाळ्यात अडकलेले दिसले़ शिगवण व त्यांच्या या सहकाऱ्यांनी जाळे कापून कासवाची सुटका केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button