
खेड रेल्वेफाट्यानजिक दुचाकी अपघातात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावरील येथील रेल्वेफाट्याजवळील बस थांब्यानजिक २ दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या खेड सुकिवली येथील ५४ वर्षीय अनिता रमेश निकम यांचा मुंबई येथील जे. जे. रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघाताची नोंद मंगळवारी सायंकाळी उशिरा येथील पोलीस स्थानकात करण्यात आली. ही घटना ४ जून रोजी घडली होती.अनिता निकम या प्रदीप चव्हाण यांच्या दुचाकीने कामासाठी घरातून खेड रेल्वेस्थानकाजवळील बस थांब्याजवळ जात असताना समोरून एक ट्रक येत होता. त्याचवेळी ट्रकच्या पाठिमागून एक काळ्या रंगाची दुचाकी ट्रकला ओव्हरटेक करून पुढे आली. याचवेळी त्यांच्या ताब्यातील दुचाकी पुढे जात असताना पाठिमागे बसलेल्या अनिता निकम यांनी घाबरून दुचाकीवरून उडी मारली. त्यांच्या उजव्या कानातून व नाकातून रक्तस्त्राव होवू लागल्याने तातडीने उपचारासाठी भरणे येथील रायल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृत गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी त्यांना मुंबई येथील जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने निकम कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. www.konkantoday.com