कोणीही या आणि फसवून जा , रत्नागिरीकरांना गाद्या विक्रेत्यांनी फसविले

रत्नागिरी शहरात टेम्पोघेऊन विविध वस्तू विक्रेते येत असतात आणि आपला माल खपवत असतात त्यातील काही वस्तू चांगल्याही असतात मात्र त्याचा फायदा घेऊन काही जण फसवणूकही करीत असतात रत्नागिरी शहरात अशाच गाद्या विक्रीच्या नावाखाली आलेल्या आलेल्या विक्रेत्यांनी रत्नागिरीकरांची फसवणूक केली झोपण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बनावट गाद्या घेऊन उत्तर प्रदेश वरून विक्रेते रत्नागिरीत दाखल झाले त्यांनी झोपायच्या गाद्याची किंमत दहा ते बारा हजार सांगितली त्यानंतर तडजोड करून त्यातील गाद्या कमी किमतीत विकल्या अनेकांनी या गाद्या विकतही घेतल्या काही जागृत नागरिकांच्या ही गोष्ट ध्यानात येताच त्यांनी यातिल काही गाद्या उघडून बघितल्या असता त्यामध्ये केवळ थर्माकोल आढळला त्यामुळे हे विक्रेते जनतेची फसवणूक करत असल्याचे लक्षात आले व त्यांनी या विक्रेत्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले या गाद्या खरेदीकरूनअनेक जण फसले गेले दरम्यान काहीजणांनी या गाद्या परत करून आपले पैसे परत घेतले रत्नागिरी करानी देखील अशा बाहेरील विक्रेत्यांकडून वस्तू घेताना दर्जाबाबत व वस्तू बाबत नीट खात्री करून घेणे जरुरीचे आहेत म्हणजे अशा घटना टाळता येऊ शकतील
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button