प्रवासी प्रतिसाद पाहून ग्रामीण व शहरी मार्गावरील एसटीच्या फेर्या वाढविण्यात येणार
लाॅकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा म्हणून एस. टी. परवानगी देण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील मोजक्याच फेऱ्या सुरू होत्या. मात्र संभाव्य प्रवासी भारमान असलेल्या मार्गावर फेऱ्या वाढविण्याचा निर्णय रत्नागिरी आगाराने घेतला आहे.
आगामी पावसाळा, शेतीची कामे, ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. प्रवासी प्रतिसाद पाहून ग्रामीण व शहरी मार्गावरील फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. ग्रामीण मार्गावर यापूर्वी १३ गाड्यांद्वारे १०४ फेऱ्या व शहरी मार्गावर ६ गाड्यांद्वारे १०० फेऱ्या सुरू होत्या. मात्र सोमवारपासून ग्रामीण मार्गावर नवीन २३ गाड्यांद्वारे १५२ फेऱ्या, तर शहरी मार्गावर नवीन १० फेऱ्याद्वारे १६० फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com