
पुण्यामध्ये ससून रूग्णालयात प्लाझमा थेरपीचा प्रयोग यशस्वी
ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीची पहिली मानवी चाचणी गुरुवारी (ता.२१) यशस्वी झाली. यामुळे अत्यवस्थ रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश आले, अशी माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी दिली.
महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयातून कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीने ससून रुग्णालयात सर्वप्रथम प्लाझ्मादान केले. रक्तातील एक घटक असलेल्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. कोरोना विषाणूंच्या विरोधात लढण्याची शक्ती शरीराला या अँटीबॉडीजमधून मिळते.
www.konkantoday.com