
रत्नागिरीच्या सुकन्याची ‘आकाशाला’ गवसणी
रत्नागिरी:- इच्छा असेल तर मार्ग दिसेल. मग परिस्थिती कशीही असो. या परिस्थितीवर मात करण्याची ताकद ही इच्छाच देत असते. आपले ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द, मेहनत, चिकाटी आणि अपार परिश्रमाची घेण्याची ताकद असेल तर ध्येयाला सुध्दा आपल्यासमोर नतमस्तक व्हावं लागतं. असंच अतिशय कठीण अस ध्येय गाठलं आहे ते रत्नागिरीतील एका सुकन्येने. 6 वर्षांची असताना या मुलीने उराशी बाळगलेलं स्वप्न आज पूर्ण केलं आहे. कठीण परिस्थित तावून सुलाखून निघालेल्या या सोन्याची झळाली उठून दिसत असे. जिल्ह्याची मान ज्या मुलीने उंचावली त्या मुलीचं नाव आहे. शिवानी नागवेकर.
रत्नगिरीच्या शिवानीचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण रत्नागिरीच्या जी जी पी एस या प्रशालेतून झाले. 11 वी 12 वी अभ्यंकर कुलकर्णी ज्यु. कॉलेज च्या विज्ञान शाखेतून झाले.
वैमानिक होण्यासाठीचा खर्च करणे शक्य नसल्याने तिला मेकॅनिकल इंजिनिअरींग साठी रत्नागिरीच्या फिनोलेक्स कॉलेज मध्ये नाईलाजास्तव प्रवेश घ्यावा लागला. परंतु वैमानिक होण्याची इच्छा तिला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे तिचं शिक्षणामध्ये लक्ष लागत नव्हतं.
इंजिनिअरींग ची दोन वर्ष कशीतरी पूर्ण करून मला आता पायलट च व्हायचं आहे असं सांगून इंजिनिअरिंग च शिक्षण मध्येच थांबवलं. नाईलाजाने तिच्या आई वडिलांनी बॉम्बे फ्लाईंग क्लब, मुंबई (जेथे JRD TATA यांनी वैमानिक होण्याचे प्रशिक्षण घेतले होते ) येथे B.Sc.Aviation + CPL या पायलट प्रशिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या क्लास I व क्लास II मेडिकल चाचणी मध्ये यशस्वी होऊन प्रवेश मिळवला.
तसेच सगळ्या पायलट प्रशिक्षणासाठीच्या परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. Aircraft Flying चे प्रशिक्षण सुरुवातीला धुळे एअरपोर्ट व नंतर 200 तासाचे प्रशिक्षण Aircraft Flying रेड बर्ड फ्लाईग अकॅडमी, बारामती येथे पूर्ण करून Commercial Pilot License प्राप्त केले.
रत्नागिरीतील राष्ट्रीय कुस्तीपटू व जिम व्यावसायिक बॉडी बिल्डर भाई विलणकर यांची शिवानी नात आहे. शिवानीचे वडील सुबोध प्रभाकर नागवेकर व्यावसायिक असून आई सौ श्रद्धा सुबोध नागवेकर मराठा मंदिर, अ. के. देसाई हायस्कुल रत्नागिरी या प्रशालेत कार्यरत आहे.
सर्वांना अभिमान वाटावा असे चिकाटीने शिक्षण पूर्ण करून वैमानिक होऊन शिवानी ने एक आदर्श सर्वांपुढे ठेवला असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.