चिपळूणमधील पूराचा मुद्दा आता थेट न्यायालयात पोहचणार chiplunflood
चिपळूणमधील पूराचा मुद्दा आता थेट न्यायालयात पोहचणार आहे. चिपळूणमध्ये आलेल्या पुरासाठी पाटबंधारे विभागाने निसर्गालाच जबाबदार धरलेलं असलं, तरी या आपत्तीनंतर नगरपालिकेने पाटबंधारे खातं, हवामान विभाग आणि महसूल विभागाला न्यायालयात खेचायचं ठरवलं आहे.
Chiplun flood issue in court
चिपळूण नगरपालिकेच्या सर्वसाधरण सभेत हा निर्णय झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व अधिकार वापरत संबंधित विभागांना नोटीस पाठवू असं चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी म्हटलं आहे.
www.konkantoday.com