१८ जिल्ह्यात गृह विलगीकरण यापुढे बंद रत्नागिरी जिल्ह्याचा ही समावेश
*राज्याच्या सरासरी एवढ्या पॉझीटिव्हीटी दरापेक्षा १८ जिल्ह्यांतील पॉझीटिव्हीटी दर जास्त आहे तेथे होम आयसोलेशन (गृह अलगीकरण) बंद करून कोविड केअर सेंटरमध्ये अलगीकरणाची सुविधा निर्माण करण्याची सूचना देण्यात आली आहे. १५ वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून ग्रामपंचायतींनी २५ टक्के निधी हा कोरोना केअर सेंटर उभारणीसाठी वापरण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मुंबईत झालेल्या एका बैठकीत दिले आहेत. या १८ जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा देखील समावेश आहे
www.konkantoday.com