दिवाळीपर्यंत कांद्याच्या किंमती गगनाला भिडणार

देशातील विविध भागामध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालंय. शेतकऱ्यांची पीक जमीनदोस्त झालीयत. कांद्यावर देखील याचा परिणाम दिसून आलाय. कांद्याच्या किंमती देखील दिवसेंदिवस वाढत असून असंच सुरु राहीलं तर दिवाळीपर्यंत कांद्याच्या किंमती गगनाला भिडतील असं म्हटल जातयं.
देशातील सर्वात मोठी कांद्याची मंडई असलेल्या महाराष्ट्रातील लासलगावमध्ये कांदा ६ हजार ८०२ रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात मोठा पाऊस पडतोय. यामुळे शेतातील कांदा खराब झालाय.गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले असताना आता सामान्यांना कांद्याच्या दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. मुंबई महानगरात कांद्याच्या किरकोळ दराने ७०-९०रुपयांवर झेप घेतली, तर पुणे परिसरात तो ५० ते ७० रुपयांच्या घरात पोहोचला. राज्य सरकारने हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी दिल्यामुळे कांद्याच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे लवकरच कांदा शंभरी गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button