‘मातृमंदिर’ला कोविडसाठी अद्ययावत सामुग्रीचे भेट

मातृमंदिर रुग्णालयाने देवरुख येथे कोविड केअर सेंटर सुरु करतांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून मातृमंदिरचे हितचिंतक आणि सभासद यांना या उपक्रमासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला मुंबई-पुणे संपुर्ण महाराष्ट्र आणि परदेशातून अभूतपुर्व असा प्रतिसाद लाभला. या माध्यमातून मातृमंदिरच्या या खेडेगावातील रुग्णालयात 30 ऑक्सीजन बेडची सुविधा आणि प्रथमच आयसीयू सुविधा उपलब्ध केली. मातृमंदिरच्या या डेडीकेटेड कोविड केंद्रासाठी महाराष्ट्रातील अनेकांकडून ऑक्सीजन कॉन्सेन्ट्रेटर, बायपॅप तसेच आयसीयू अद्ययावत बेड आणि अन्य कोविड सेंटरसाठी अद्ययावत सामुग्री देणगी स्वरुपात मिळाली असून ती हॉस्पिटल प्रमुख डॉ. परमेश्वर गोंड यांच्या कडे संस्था अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये आणि कार्यवाह आत्माराम मेस्त्री यांच्या हस्ते आज देण्यात आली. संपुर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मातृमंदिर कोविड सेंटर असे एकमेव संस्थात्मक सेंटर आहे. जे देवरुख सारख्या सह्याद्रिच्या खोऱ्यातील दुर्गम भागात कोविड डेडीकेटेड सेंटर उभारत अद्ययावत सवलत, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण आणि गरीबांना आर्थिक सवलतीत औषधोपचार उपलब्ध करुन देत आहे. मातृमंदिरच्या डेडीकेटेड कोविड सेंटरचे पुर्ण आरोग्य व्यवस्थापन डॉ. परमेश्वर गोंड यांच्या एसएमएस हॉस्पिटल मार्फत चालते. डॉ. पाटील, डॉ. शिंदे पाटील, डॉ. कासार आणि भूलतज्ञ डॉ.ठोंबरे सोबत तज्ञ नर्स आणि सारी टीम अविरतपणे काम करत आहेत. याचा परिणाम रुग्णांना अत्यंत उत्तम औषधोपचार, सुविधा आणि मानसिक समुपदेशन सुविधा प्राप्त होत आहेत. उत्तम डायग्नोसीस यामुळे येथील रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण 90 टक्के आहे. आजपर्यंत 60-65 रुग्ण गेल्या 15 दिवसात बरे होऊन बाहेर पडले आहेत. देवरुख परिसरातील मार्च एप्रिल महिन्यातील रुग्णवाढीचा बेफाम वेग आणि त्यांना न मिळू शकणारी आरोग्य सुविधा त्या अभावी काही रुग्णांना आलेले मृत्यू. हे पाहतांच मातृमंदिर हॉस्पिटलने एमएमएस हॉस्पिटलच्या सहाय्याने तात्काळ कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला. डॉ. परमेश्वर यांचा या क्षेत्रातील प्रदिर्घ अनुभव आणि एकुणच नव्या तंत्रज्ञानाची जोड याचा अभूतपुर्व जोडणी करत त्यांनी या हॉस्पिटलला काही दिवसातच डेडीकेटेड कोविड सेंटरमध्ये रुपांतरीत केले. इटेन्सीव्ह केअर यूनिट सुविधा ही तर देवरुखातील पहिली 10 बेडची आयसीयू सुविधा उपलब्ध झाली आहे. गेल्या 20-25 वर्षाचे या परिसराची ती मागणी होती. या सुविधे अभावी येथील अनेक मान्यवरांना कोल्हापूर – रत्नागिरी येथे रुग्णालयात पोहोचण्यापुर्वाच प्राण गमवावे लागल्याची देवरुख वासीयांची वर्षानुवर्षाची खंत होती ती या माध्यमातून पुर्ण झाल्याचे समाधान यावेळी कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले मातृमंदिर कोविड केंद्र सुरु करतांना ते अत्यंत कमी यंत्रणेच्या उपलब्धतेत कसे चालवावे हा प्रश्न होता. मात्र मातृमंदिर संचालक मंडळाने अत्यंत धाडसी निर्णय घेत हे कोविड केअर सेंटर सुरु केले आणि मातृमंदिरच्या सभासद आणि हितचिंतकांना मदतीची साद घातली. मातृमंदिरच्या परिवार महाराष्ट्रात आणि देशात देशाबाहेर प्रचंड विस्तारीत आहे. इंदिराबाई हळबे यांनी 1954 साली फक्त मातृमंदिर या हॉस्पिटलची दोन कॉटच्या साहाय्याने स्थापना केली नाही तर त्यांनी एका नव्या सामाजिक चळवळीला जन्म दिला. या सामाजिक चळवळीत त्यांनी अनेकांना जोडून घेतले. मातृमंदिर व्यक्तीकेंद्रित आणि संचकुचीत न ठेवता मातृमंदिर नावाची सामाजिक चळवळ अधिकाधीक लोकांसोबत, समुहा सोबत जोडून घेतली. मावशींच्या या अभूतपूर्व योगदानीची भविष्याचा वेध घेणाऱ्या धोरणाची विचारांची प्रचिती लोकांची मनात श्रध्दारुपात होती आम्ही फक्त त्याला साद घातली आणि या संचीताचे रुपांतर अभूतपुर्व प्रतिसादात झाले. आम्ही फक्त निमित्त मात्र ही सारी पुण्याईच त्या माऊलीची सावलीसारखी मातृमंदिरच्या प्रत्येक क्षणाला कार्यरत होणारी. मातृमंदिरच्या या आवाहनाला उत्कट आणि उत्फुल्ल प्रतिसाद लाभला जो आम्हा साऱ्या संचालक आणि कार्यकारी मंडळाचा उत्साह वाढविणारा होता. त्यामुळे कोविडच्या समस्येवर मात करत आमचा कर्मचारीही या कार्यात आपले योगदान समर्पित करत राहीला. या सहयोग प्रक्रियेतील पहिला मान मी आमचे मार्गदर्शक मित्र डॉ. आशिष देशपांडे यांच्या फोनला देईन. त्यांनी फोन करुन मला काही निवडक महत्वाच्या टीपस् दिल्या, छानसे निवेदन मराठी इंग्रजीत करण्याचे मार्गदर्शन केले. आणि कोविड सेंटर सुरु करण्याच्या आमच्या निर्णयाला ठाम पाठींबा दिला. ते खुपच महत्वाचे होते. सोबत स्वतःचे तात्काळ 10,000/-चा निधी आणि त्या पाठोपाठ श्री. कुळकर्णी यांचा 2 लाखाचा निधी हा अत्यंत विस्मयजनक उत्साह वाढविणारा होता. त्याचवेळी अपना बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके यांनी अडीच लाखाचे दोन ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर पाठविण्याची केलेली व्यवस्था, मातृमंदिरचे माजी उपाध्यक्ष अशोकदादा वायकुळ यांचा उत्साह तर विलक्षण चैतन्यमय त्यांनी स्नेह ग्रुपच्या माध्यमातून 100 पेक्षा अधिक सहकाऱ्यांना या कार्यात सहभागी करत उलाखापेक्षा अधिक निधी जमवून दिला. त्याच बरोबर गीता ताई, शरद कदम यांनी आपल्या सहकारी ग्रुप माध्यमातून निधी दिला. सध्या 30 बेड ऑक्सीजन सुविधे सह सज्ज आहेत. या मतदारसंघातील आमदार शेखर निकम यांनी मोठे आर्थिक सहकार्य केले तसेच त्यांच्या माध्यमातून आलेले डॉ. इरफान चिकटे यांच्या संस्थेमार्फत मातृमंदिरला स्वतंत्र ऑक्सीजन प्लँट उभारणार आहेत. सध्य परिस्थितीत कोविड कीती वाढणार याचा अंदाज नाही मात्र पुढील तिसरी लाट ही लहान मुलांच्या सहभागाची असेल असा धोका व्यक्त होत आहे याचा विचार करुन मातृमंदिर हॉस्पिटल स्वतंत्र 10-20 बेडचा लहानमुलांचा विभाग ही सुरु करण्याचे नियोजन करत आहे. देवरुख परिसरातील 100 गावांना उत्तम आरोग्य सुविधा देणे हे मातृमंदिरचे ध्येय असून कोविड काळात मातृमंदिरने या सुविधा अधिक व्यापक केल्या आहेत. या उपक्रमासाठी मातृमंदिरला हजारो हातांचे सहकार्य लाभत आहे त्याचे मातृमंदिर सदैव रुणी असल्याचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी सांगीतले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button