एमआयडीसी येथील क्रीडा संकुलाकडे दुर्लक्ष

रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला चालना मिळावी यासाठी आघाडी सरकारच्या काळात रत्नागिरी एमआयडीसी येथे क्रीडा संकुल उभे केले जाणार होते.यासाठी एमआयडीसीमध्ये जागा घेऊन कामाला सुरुवातही झाली होती.हे क्रीडा संकुल दोन टप्प्यात विकसित केले जाणार होते.या क्रीडा संकुलात विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेण्याच्या दृष्टीने सोयी व सुविधा उभारण्यात येणार होत्या.त्यामध्ये निवासाची व्यवस्था विविध,खेळांची सुविधा एकत्रितरित्या या ठिकाणी उभी केली जाणार होती. या क्रीडा संकुलासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला होता. यातील पहिल्या टप्प्यातील बरेचसे काम पूर्ण झाले आहे. मात्र त्यानंतर या क्रीडा संकुलाचे काम रेंगाळले आहे.सध्या या क्रीडा संकुलाकडे कोणीच लक्ष देत नसल्याने येथील मैदानाचा वापर कचरा टाकण्यासाठी होत आहे.याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून या ठिकाणी क्रीडा संकुल सुरू करावे व उर्वरित कामासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी क्रीडाप्रेमींकडून होत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button