
नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून पुणे, मुंबई, ठाणे,व्यसनमुक्तीबाबत जनजागृती मोहीम
गणेश विसर्जन मिरवणुकीत उपक्रम

नाणीज दि. १२: अनंत चतुर्थी व गणेश विसर्जन मिरवणूकदिनी
पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण पालघर, वसई, येथील तरुण व तरुण – तरुणींनी व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली. हातात विविध घोषवाक्यांचे फलक त्यांनी हाती घेतले होते. रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेतून ही मोहीम राबविण्यात आली.
रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी व्यसनमुक्तीवर १९९२ पासून काम करत आहोत. 33 वर्षापासून लाखो लोकांना त्यांनी प्रबोधनातून व्यसनमुक्त केले आहे. त्यामुळे त्यांचे संसार उभे राहिले आहेत.दर महिन्याला कमीत कमी ५०० ते ६०० लोक व्यसनमुक्त होतात.
याच अनुषंगाने, विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी ठिकठिकाणी तरुण व्यसनमुक्तीबाबत फलकाद्वारे संदेश देऊन जनजागृती करत होते. रात्रभर तरुण-तरुणी फलक घेऊन .. व्यसन किती धोकादायक आहे हे पटवून देत होते. रामानंदाचार्य नरेंद्रचार्य यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या तरुणांचे अनेकांनी कौतुक केले.
पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर व कारपोरेशन या ठिकाणी व्यसनमुक्ती प्रचार व प्रसार केला.
मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज तलाव, बैलबाजार, कुर्ला, लालबाग, शिवसेना शाखा क्रमांक ३०, एम, जी, रोड कांदिवली, गोरेगाव, बांगूरनगर, महेश्वरी गार्डन आणि फाय गार्डन हायवे जवळ, श्याम तलाव, जोगेश्वरी पूर्व, छत्रपती शिवाजी महाराज तलाव, बैल बाजार, कुर्ला, तिसाई तलाव तिसगाव, कल्याण पूर्व, वसई, नालासोपारा
या ठिकाणी तरुण-तरुणी बॅनर धरून प्रचार व प्रसार केला.
दक्षिण ठाणेच्या वतीने कल्याण पूर्व येथील विसर्जन घाटावर प्रचार करण्यात आला.पूर्व पालघरच्या वतीने पालघर आणि भोईसर येथील विसर्जन घाटावर प्रचार करण्यात आला. परळ ते गिरगाव येथे निघालेल्या मिरवणुकीत प्रचार करण्यात आला.
फोटो ओळी –
मुंबई, पुणे येथे ठिकठिकाणी तरुणांनी विसर्जन मिरवणुकीत तरुणांनी व्यसनमुक्तीबाबत फलक झळकावून जागृती केली.




