
तोत्के चक्रीवादळात नुकसानग्रस्त ठरलेल्या आपल्या शाळेच्या दुरुस्ती व उभारणीसाठी माजी विद्यार्थी सरसावले.
⭕ इयत्ता दहावी २००६ ची बॅच,च्या ६० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने केली निधी उभारणी
हातखंबा- तोत्के चक्रीवादळाचा रत्नागिरीतील ग्रामीण भागाला चांगलाच फटका बसला, त्यात हातखंबा येथील गुरुवर्य अ. आ. देसाई विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज हे नुकसानग्रस्त ठरले. इमारतीवरील पत्रे उडून गेल्याने आणि काही भागाची पडझड झाल्याने पावसाचे पाणी वर्ग खोल्यांमध्ये भरले. यामुळे शाळेतील विविध साहित्य सामुग्री चे नुकसान झाले आहे. शाळा व्यवस्थापनाकडून मदतीसाठी आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती मिळताच या मदतीत आपणही खारीचा वाटा उचलूया, या हेतूने इयत्ता दहावी ची २००६ ची बॅच, चे विद्यार्थी सरसावले. कोरोना च्या भीषण महामारी मध्ये सर्वांचेच काम धंदे बंद आहेत, तरीही आपल्या शाळेची झालेली पडझड पाहून या बॅच मधील जवळजवळ ६० विद्यार्थ्यांनी शाळेच्या दुरुस्ती व उभारणीसाठी ऑनलाइन पद्धतीने निधी उभा केला. आणि सदर निधी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय पठाण सर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. शाळा व्यवस्थापनाच्या वतीने पठाण सर यांनी धन्यवाद व समाधान व्यक्त केले व शाळेविषयी असलेले आपले प्रेम, आदर,सहकार्य असेच सदोदित राहो अशी सदिच्छा व्यक्त केली
www.konkantoday.com