
स्वच्छता पंधरवड्याचा समारोप जिल्हा कारागृहात
खेडशी-शीळ बाळ सत्याधारी अध्यात्मिक सेवा केंद्र व भारत सरकार नेहरू युवा केंद्र यांच्यावतीने जिल्ह्यात स्वच्छता अभियान पंधरवडा पार पडला. या स्वच्छता अभियानाचा समारोप नुकताच जिल्हा विशेष कारागृहात झाला. यावेळी कारागृह अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने परिसराची साफसफाई करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, तुरूंगाधिकारी आर. आर. देशमुख, बाळ सत्यधारी, कर्मचारी नेते सुधाकर सावंत, निवृत्त प्राचार्य प्रताप सावंत देसाई, मराठा मंडळाचे कार्याध्यक्ष केशवराव इंदुलकर, उद्योजक मुकेश गुप्ता आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com