कशेडी घाटात ट्रकला अपघात; चालक जखमी

खेड : कपडे तयार करण्यासाठी लागणाऱ्या रसायनाचे ड्रम वाहून नेणारा ट्रक कशेडी घाटात पलटी होवून झालेल्या अपघातात चालक जखमी झाला. या अपघातात मनुष्यहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे.
वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक बोरकर यांनी दिलेल्या माहिती नुसार मुंबईत भांडूप येथे राहणारा सुरज चंद्रकांत शेडगे (३०) हा आपल्या ताब्यातील ट्रक मध्ये कपडे
तयार करण्यासाठी लागणाऱ्या रसायनाचे भरलेले ड्रम घेऊन मुंबईहून रत्नागिरीकडे निघाला होता. सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास तो कशेडी घाट उतरत असताना आंबा स्टॉपजवळील एका अवघड वळणावर त्याचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यात पलटी झाला. या अपघातात चालक सुरज हा किरकोळ जखमी झाला. मात्र ट्रकमधील रसायनाने भरलेले ड्रम रस्त्यावर पडून फुटल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
अपघाताची खबर मिळताच कशेडी टॅपचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक बोरकर हे तात्काळ आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात जखमी झालेला चालक शेडगे याला तात्काळ रुग्णवाहिकेने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. ट्रक मधून वाहून नेले जात असलेले रसायन ज्वालाग्रही नसल्याने मोठा अनर्थ टळला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button