
वयोवृध्द आणि विकलांगांच्या घरोघरी लसीकरणासाठी केंद्राच्या परवानगीची वाट बघू नका -हायकोर्टाचे निर्देश
कोरोनापासून बचावासाठी लस हे एक महत्त्वाचे शस्त्र आहे. धडधाकट व्यक्ती लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकते पण अंथरुणाला खिळलेल्या, वयोवृध्द आणि विकलांगांचे काय? त्यांना लस कशी मिळणार? मुंबई महानगरपालिकेला त्यासाठी केंद्र सरकार परवानगी देत नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या एका आदेशाने ही समस्या दूर झाली आहे. केंद्राच्या परवानगीची वाट बघू नका, अशा नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस द्या असे असे उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला सांगितले.
www.konkantoday.com