
रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे — जमीअते उलेमा महाराष्ट्र आमदार राजन साळवी यांच्या पाठीशी — मो. डॉ. एजाज पन्हळेकर
मागील दोन वर्षांपासून राजापूर रिफायनरी प्रकल्पा विरोधात अफवा पसरवून लोकांच्या मनात गैर समज निर्माण करणाऱ्याना कोकणी जनते बाबत काही देणे घेणे नाही ? अगोदर जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पा बाबत विरोध केला गेला होता व आता रिफायनरी बाबत चूका केल्या जात आहेत. अशा भूमिके मुळे आपल्या भागाचा विकास होणार नाही हे जनता चांगले ओळखत आहे. जमीअते उलेमा ए महाराष्ट कोकण चे प्रमुख डॉ.मौ. एजाज पन्हळेकर यांनी आमदार राजन साळवी यांच्या भूमिकेचे स्वागत करून कोकणी जनतेच्या भल्याचा हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत झाला पाहिजे अशी भूमिका जाहीर केली आहे.जमीअते उलेमा रत्नागिरी सिंधुदुर्ग चे सर्व युनिट्स या साठी आमदार राजनजी साळवी यांना पूर्ण पाठिंबा देत असून आमदार साळवी यांनी प्रकल्प लवकर सुरू होण्या साठी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे पाठपुरावा करावा असे आवाहन केले आहे
www.konkantoday.com