
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकार राज्यावर तर राज्य सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलत असल्याचा संभाजीराजे यांचा आरोप
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकार राज्यावर तर राज्य सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलत आहे अशी टीका खासदार संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे. मी सामंज्यस्याची भूमिका घेतो, काही लोक टीमटीम करत आहेत असाही आरोप त्यांनी केला. येत्या २७ तारखेला आपण मुंबईत मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांची भेट घेणार असून त्यांच्यासमोर समाजाची भूमिका मांडणार असल्याचं सांगत, आपली भूमिकाही त्या दिवशीच ठरेल असं खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलं.
www.konkantoday.com