
अन्यथा मराठा समाजासाठी आम्हाला ‘एप्रिल फुल’ आंदोलन करावे लागेल-शिवसेना नेते सतीश सावंत
राज्य शासनाने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा केवळ भास निर्माण केला.सध्या स्थितीत पोलिस भरतीसाठी उमेदवारांना नॉन क्रिमिलियर दाखला मिळत नाही. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी किशोर तावडे यांनी लक्ष घालून तात्काळ दाखले मिळतील याची उपाययोजना करावी. अन्यथा मराठा समाजासाठी आम्हाला ‘एप्रिल फुल’ आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिवसेना नेते सतीश सावंत यांनी येथे पत्रकार परिषदेतून दिला. शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक उपस्थित होते.www.konkantoday.com