कोकणातच औषधी वनस्पती प्रकल्पसाठी 50 एकर जामिन आडाळीत देण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय स्वागतार्ह – अँड विलास पाटणे

कोकणातील आडाळी -दोडामार्ग येथे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने औषधी वनस्पती प्रकल्पासाठी मंजुरी देऊन सुद्धा अद्यापपर्यंत राज्य शासनाने जागा दिली नव्हती. परंतु आजच्या मंत्रीमंडळाच्या मिटींगमध्ये आडाळी ,दोडामार्ग सिंधुदुर्ग येथे 50 एकर जागा देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे .या प्रकल्पामुळे कोकणात रोजगार निर्माण होईल.ना श्रीपादभाऊ नाईक ,आयुष मंत्री यानाही धन्यवाद.  प्रकल्पासाठी त्वरित जागा देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात,  अँड राकेश भाटकर यांचे मार्फत जनहित याचिका दाखल केली आहे.

भारत सरकारचा औषधी वनस्पती लागवडीचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आयुष मंत्रालयाचे मंत्री मा. श्रीपाद नाईक यांनी मंजूर केला असून सातत्याने दोन वर्ष पाठपुरावा करून सुद्धा जागा उपलब्ध करुन देण्यात आली नव्हती
राज्य सरकारने हा प्रकल्प जळगाव येथे करण्यात यावा अशा मागणीचे पत्र आयुष मंत्रालयाला दिले होते परंतु आयुष संचालकांनी राज्य शासनाची ही मागणी फेटाळली आहे. त्यानंतर आता पुन्हा हा प्रकल्प लातूरला नेण्याचा प्रयत्न चालू होता . जागतिक संघटनेने औषधी वनस्पतींसाठी पश्चिम घाट हा उपयुक्त मानलेला असून त्या अनुषंगाने आयुष मंत्रालयाने तिथे प्रकल्प राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.
२०१८ सालामध्ये सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून प्रस्तावित जागा निश्चित केली आहे. तसा प्रस्ताव राज्य शासनास पाठवला आहे. ही जनहित याचिका दिनांक 4 फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री सय्यद व श्री जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणीस असता महाराष्ट्र सरकार तर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले . प्रतिज्ञापत्रा मध्ये, जागा निश्चित करण्यात आली असून त्या जागेत ची मालकी ही एमआयडीसीकडे असल्याने त्या विभागाच्या प्रमुखांकडे पत्रव्यवहार चालू असल्याचे म्हटले होते
परंतु आडाळीयधील राष्ट्रीय औषधी प्रकल्प मार्गी लागला ही समाधानाची बाब आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button