महाहोममिनिस्टर सौ. लक्ष्मी ढेकणे यांचा जाहीर नागरी सत्कार.

झी मराठीवरील महाहोममिनिस्टर या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत, महाराष्ट्रातील दहा केंद्रातून महाविजेत्या म्हणून आपल्या रत्नागिरीच्या सौ.लक्ष्मी मंदार ढेकणे या, अकरा लाखाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या आहेत.

सौ.लक्ष्मी ढेकणे यांना ही मानाची महापैठणी मिळाल्याबद्दल, आपल्या रत्नागिरी करांकडून विविध स्तरातुन त्यांचे कौतुक होत आहे. रत्नागिरीतील तमाम महिलावर्ग , वहिन्या यांच्या उपस्थितीत सौ.लक्ष्मी यांचा जाहीर सत्कार व्हावा, अशी रत्नागिरीकरांची इच्छा आहे. सौ. लक्ष्मी या रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन या परिवाराच्या सदस्य आहेत, म्हणून सर्व रत्नागिरी करांच्यावतीने महा होममिनिस्टर सौ. लक्ष्मी मंदार ढेकणे यांचा जाहीर नागरी सत्कार मा.स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहामध्ये शनिवारी दिनांक 2.07.2022 रोजी दुपारी
3.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत मान्यवरांच्या हस्ते करण्याचे आयोजन रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन यांनी केले आहे.

या जाहीर नागरी सत्कारासाठी व सौ. लक्ष्मी यांचे कौतुक करण्यासाठी तमाम महिला वर्ग , सौ. लक्ष्मी यांचा मित्रपरिवार , त्यांचे हितचिंतक , या उपक्रमातील सहभागी सौ. लक्ष्मी यांच्या सर्व सख्या व वहिन्या यांनी, आवर्जून उपस्थित रहावे, असे विनंतीपूर्वक आवाहन रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मीडटाऊनच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सौ. शाल्मली विनय आंबुलकर व त्यांच्या टीमने केले आहे.

या प्रसंगी , सौ.लक्ष्मी ह्या त्यांच्या महाहोम मिनिस्टरच्या प्रवासासंदर्भात, जाहीर छोटेखानी प्रकट मुलाखतीद्वारे , सर्व प्रवास उलगडणार आहेत.

या कार्यक्रमास उपस्थित रहाणार्‍या सर्वांनी सध्या कोविडचा वाढता प्रसार लक्षात घेता, मास्कचा वापर करावा. तसेच, सर्वांच्या प्रकृतीचा विचार करिता पुष्पगुच्छ आणू नयेत /आणायचाच ठरविलेस ती रक्कम रोटरी फंडला मदतीदाखल वर्ग करावी, शक्यतो एकमेकांशी हस्तांदोलन टाळावे, असे आवाहन सौ.लक्ष्मी व रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मीडटाउन यांनी केले आहे.

या उपक्रम प्रसंगी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मीडटाउन या, रत्नागिरी परिसरामध्ये शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, माता बालसंगोपन, क्रीडा इत्यादी उपक्रमामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या क्लबला आर्थिक सहाय्य करावयाचे असल्यास, ऐच्छिक मदत सहाय्य व्यवस्था, उपक्रम ठिकाणी करण्यात येणार आहे, असे देखील टीम रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन यांनी सूचित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button