
पहिल्या वाढदिवसाच्या प्रत्येकाच्या संकल्पना असतात पण आज एक अनोखा वाढदिवस शिर्के हायस्कुल मध्ये हेल्पींग हँडद्वारे साजरा झाला
वय वर्ष १ कोरोना पाॅझीटीव तसेच दुसरी मुलगीही पाॅझीटीव आई बाबाही 4दिवसा पूर्वी पाॅझीटीव आले पण त्यावेळी त्याच्या दोन्ही मुलांची टेस्ट निगेटिव्ह आली. स्वतःच्या लेकरांना काही होऊ नये म्हणून ते आईवडील त्या लेकरांना त्यांच्या मावशी कडे ठेवून स्वतः रायपटन येथे आयसोलेशन झाले पण आज चार दिवसांनी त्या लेकरांनची परत टेस्ट करण्यात आली तेव्हा ती दोन्ही लेकरं ( वय वर्ष 3 आणि वय वर्ष 1) पॉझिटिव्ह आली मग त्या लेकरांना तिकडे पाठवण्यापेक्षा त्यांच्या आइवडिलानाच रत्नागिरी मध्ये शिफ्ट करायचे ठरविण्यात आले तशी त्यांच्या एकत्र राहण्याची सोय सुद्धा करण्यात आली.आई वडील तिकडून रत्नागिरी मध्ये येई पर्यंत संध्याकाळचे 6 वाजले जेव्हा ते रत्नागिरी मध्ये आले तेव्हा हेल्पिंग हँडला असे समजले की आजच त्या मुलाचा पहिला वाढदिवस होता. इतके असूनही दुःखातून आनंद शोधण्याचा एक छोटासा प्रयत्न आज झाला आहे.
पहील्या वाढदिवसाच्या प्रत्येकाच्या संकल्पना असतात पण आज एक अनोखा वाढदिवस शिर्के हायस्कुल मध्ये हेल्पींग हँडद्वारे साजरा झाला. एक वर्षाच्या मुलाचा वाढदिवस तोही मुलगा पाॅझीटीव असून. केक कापताना चे मुलाच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून दिवसभराचा शीण कुठे निघून गेला कळलच नाही. त्याची बहीण आणि आई बाबा पाॅझीटीव असूनही त्याच्या चेहर्यावर हास्य फुलताना पाहून खूप छान आणि बरे वाटले.
प्रसंग कितीही दुःखाचा असला तरी त्यातूनही सुख शोधण्याचा एक छोटासा प्रयत्न हेल्पींग हँड मार्फत आज झाला.
www.konkantoday.com