
खेड तालुक्यातील तळे-कासारवाडी येथे विंचु दंशाने 17 वर्षीय युवकाचा मृत्यू
खेड तालुक्यातील तळे-कासारवाडी येथे विंचु दंशाने 17 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज 13 जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली. सोहम मंगेश शिर्के असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकाराने शिर्के कुटुंबियांवर दु:खा डोंगर कोसळला आहे.
तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या अनुपस्थित मुळे या तरुणाला वेळेत उपचार मिळाले नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे त्यामुळे त्याचा मृत्यू झाला त्याला आरोग्य यंत्रणा जबाबदार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे दहावी उत्तीर्ण झालेल्या सोहमने इयत्ता 11वीसाठी प्रवेश अर्ज भरला होता. राहत्या घरी त्याला विंचू दंश झाल्याने उपचारासाठी तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी डेरवण रूग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.