परवानाधारक रिक्षाचालकांना फॉर्म भरण्याची गरज नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना १५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वीच शासनाने घेतला आहे. तथापि, काही प्रतिनिधी संघटना परवानाधारक रिक्षा चालकांकडून मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेत आहेत, अशा तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयास प्राप्त होत आहेत. याच तक्रारींची दखल म्हणून परवानाधारक रिक्षाचालकांना फॉर्म भरण्याची गरज नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com