
मुंबई विद्यापीठाच्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांतील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या पदवी, अंतिम वर्ष सत्र-६च्या परीक्षा आज ६मे पासून सुरू
मुंबई विद्यापीठाच्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांतील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या पदवी, अंतिम वर्ष सत्र-६च्या परीक्षा ६ मेपासून सुरू होणार आहेत. ऑनलाइन माध्यमातून घेण्यात येणारी ही परीक्षा २१ मेपर्यंत सुरू राहील. ४५०हून अधिक महाविद्यालयातील दीड लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून ६ ते २१ मे या कालावधीत आपल्याल्या वेळापत्रकानुसार महाविद्यालयांनी परीक्षेचे नियोजन केले आहे.
www.konkantoday.com