
पठाणी कुर्ता-सलवार, सलमान खानचा ईदचा खास लूक.
अनेक सेलिब्रिटीही ईद साजरा करताना दिसत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी चाहत्यांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.चाहते वाट पाहत होते ते सलमान खानच्या एका झलकची.आणि चाहत्यांची ही इच्छाही पूर्ण झाली आहे. सलमान खानने चाहत्यांना अखेर ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.घराच्या बाल्कनीतून चाहत्यांना दाखवली एक झलकसलमान खानने नेहमीप्रमाणे त्याच्या घराच्या बाल्कनीतून चाहत्यांना त्याची झलक दाखवली आहे. यावेळी नक्कीच सलमान खानच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली.
बुलेटप्रूफ काचेच्या मागे उभे राहून सलमानने त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचे स्वागत केलेलॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खानभोवतीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तथापि, यानंतरही, सलमान ईदच्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहोचण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. सलमानने त्याच्या बुलेटप्रूफ बाल्कनीतून लोकांना हात दाखवून त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्याने पांढरा पठाणी कुर्ता आणि सलवार घातला होता, ज्यामध्ये तो खूप सुंदर दिसत होता.