
खेडमध्ये २४.५३ लाख महिलांचा सन्मान जनक प्रवास*
खेड बसस्थानकातून गतवर्षी अवघ्या दहा महिन्यात २४ लाख ५३ हजार ९२६ महिलांनी सन्मानजनक प्रवास केला. महिलांसाठी प्रवासात अर्ध्या तिकिटाची योजना लागू केल्यापासून ग्रामीण भागासह लांब पल्ल्यावरील प्रवासासाठी एसटीला सर्वाधिक पसंती मिळत आहे. यामुळे ५ कोटी ३ लाख ७९ हजार ५९ रुपयांचे उत्पन्न आगारास प्राप्त झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांचाही उदंड प्रतिसाद लाभल्याने उत्पन्नात वाढ झाली आहे. गतवर्षी एप्रिल ते डिसेंबर दरम्यान २४ लाख ५३ हजार ९२६ महिलांनी महिला सन्मान योजनेचा लाभ घेतला. www.konkantoday.com