आयपीएल स्पर्धा करोनाच्या सावटाखाली,आज कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना पुढे ढकलला
आयपीएल २०२१ स्पर्धेत आज कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार होता. मात्र या सामन्यापूर्वी दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याने सामना पुढे ढकलण्यात आला आहे. करोनामुळे खेळाडूंच्या गोटात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आयपीएल स्पर्धा करोनाच्या सावटाखाली होत असल्याने खेळाडू बायो बबलमध्ये खेळत आहेत. तसेच कडक नियमावली लागू करण्यात आली. अशात खेळाडूंना करोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे
www.konkantoday.com