
लसीकरणा बाबत गुन्हा दाखल करण्याची अनिकेत पटवर्धन यांची मागणी
भारतीय जनता पक्ष युवामोर्चाचे दक्षिणचे अध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी काल शहर पोलीस ठाण्यात अनधिकृत लसीकरणाबाबत तक्रार अर्ज देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे
शहरातील केतन मंगल कार्यालय मध्ये झालेल्या लसीकरणाबाबत रीतसर तक्रार अर्ज पटवर्धन यांनी शहर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे .
त्याबाबत त्यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे की केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे देशात सर्वत्र लसीकरण सुरू असताना केतन मंगल कार्यालय आठवडा बाजार येथे दोनशे लोकांसाठी लसीकरण कॅम्प कोणी आयोजित केला होता? शासनाने हा कॅम्प आयोजित केला असल्यास शासनाने याबाबतचे अधिकृत पत्र दिले होते का ?
तसेच यासाठी लस कोणी उपलब्ध करून दिली याची चौकशी होणे आवश्यक आहे.
त्या दिवशी ऑनलाइन नोंदणी केलेल्या लोकांना परत जावे लागले त्यांच्यावर अन्यायच आहे .
तसेच सदरचे लसीकरण कोणत्या आदेशानुसार करण्यात आले याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
www.konkantoday.com