
जेएसडब्ल्यूचे ड्रेजिंग मॅनेजरला दमदाटी ,जयगड येथील सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जेएसडब्ल्यूचे ड्रेजिंग मॅनेजर जयेंद्र शिंदे यांना दमदाटी करून जबरदस्तीने मासेमारीच्या बोटीत बसवुन जयगड मच्छीमार सोसायटीच्या कार्यालयात येऊन दमदाटी केली या आरोपावरून जयगड येथील बशीर हाेडेकर यांच्यासह सोळा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे यातील फिर्यादी हे जयगड पोर्ट येथेदहा बारा कामगारांसह ड्रेजिंग चे काम करीत असताना यातील आरोपी घटनास्थळी आले व त्यांनी तुम्हाला परवानगी आहे का तुम्ही कागदपत्र ताबडतोब दाखवा असे सांगून दमदाटी केली त्यानंतर फिर्यादी व साक्षीदार भरत कुमार यांना आरोपींच्या मासेमारी बोटीतुन जयगड जेटीवर आणण्यात आले त्यानंतर त्यांना जयगड मच्छीमार सोसायटीच्या कार्यालयात आणण्यात आले तेथे त्यांना जबरदस्तीने बसवून तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताबडतोब बोलवुन घ्या अशी दमदाटी करण्यात आली याप्रकरणी फिर्यादी शिंदे यांनी जयगड पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली त्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
www.konkantoday.com